– आरोपीस अटक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२७ : जुन्या वादाचा राग मनात धरून ठेवून दिवसाढवळ्या भुमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यावर चाकुने हल्ला करत हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गडचिरोली शहरातील टि पॉईट चौकात गुरूवार २७ जुन रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. सौरभ ताटिवर (वय २६ ) रा. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. सदर घटनेने गडचिरोली शहरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुमी अभिलेख कार्यायल गडचिरोली येथे शिपाई पदावर कार्यरत असलेले दिनेश काकडे (वय २५) मु.पो.ता. मानवत जि. परभनी (हल्ली मुक्काम गडचिरोली) हे दुपारच्या सुमारास टि पाँईट चौकतील मेस मध्ये जेवण करीत असतांना आरोपी सौरभ ताटिवर यांने धारदार शस्त्राने दिनेश काकडे यांच्यावर वार करित गळा चिरला. दरम्यान जवळच असलेल्या नागरिकांनी धावघेत) आरोपीस रोखले. यावेळी आरोपीने नागरिकांन सोबत झटापट केल्याचे कळते. दिनेश काकडे यांच्या गळ्यावर व कुशीत गंभीर जखम झाली लागलीच काकडे यांना जिल्हा सामान्य रुग्णलयात उपचारा करिता दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरानी सांगीतले. आरोपी सौरभ ताटिवर यास गडचिरोली पोलीसांनी अटक केली असुन पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहे.