लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : एज्युमिट अकॅडमी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च २०२४ चा अंतिम निकाल नुकता जाहीर झाला. त्यामध्ये गडचिरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा संकुल शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त करत जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत प्रावीण्य प्राप्त केले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संबोधी अनिल सोरते (वर्ग पहिला ) जिल्हा यादीत प्रथम राज्य यादीत १२, ऐक्यदा टीकाराम गेडाम (वर्ग तिसरा ) जिल्हा यादी प्रथम राज्य यादी २१, श्रीद्धी प्रमोद जेट्टीवार (वर्ग चौथा) जिल्हा यादी प्रथम राज्य यादी १४, कृतिका लोमेश कोहपरे (वर्ग चौथा) जिल्हा यादीत द्वितीय राज्य यादी १५, राज मनोज कोटगले ( वर्ग पाचवा ) जिल्हा यादी प्रथम राज्य यादी १९, घनप्रिय भूषण नैताम (वर्ग पाचवा ) जिल्हा यादी द्वितीय राज्य यादी २४, श्रावणी हेमंत भोयर (वर्ग सातवा ) जिल्हा यादी द्वितीय राज्य यादी २०, तारका रंजन रामटेके (वर्ग आठवा ) जिल्हा यादी तृतीय राज्य यादी १८ यांचा समावेश आहे.
सदर परीक्षा मार्गदर्शक तत्त्वावर आधारित व NEP २०२० वर थीम बेस्ट आधारित अशी महाराष्ट्रातील एकमेव परीक्षा आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील पहिली ते आठवी चे २० हजारापेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होते .. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून ३५० विद्यार्थी सदर परीक्षेला सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील अनेक विद्यार्थी या परीक्षेत चांगला गुणाने उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला रामटेके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वराडे, सदस्य खलिप घुटके, वैशाली पिंपळशेंडे, सखाराम खोब्रागडे, टेकरे, शिक्षिका कविता खोब्रागडे, रेखा बोभाटे, वंदना गेडाम, अनिल खेकारे, निशा चावर, रंजना शेडमाके, संदीप मेश्राम, ओम पुराम, कपिल मशाखेत्री व पालकांनी कौतुक केले आहे.