लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली पोलीस दलामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस चालक पदाची लेखी परीक्षा जाहिर करण्यात आली असुन शारीरीक चाचणी परीक्षा आणि वाहन कौशल्य चाचणी मध्ये उत्तीर्ण होवून लेखी परिक्षेकरीता पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबत उमेदवारांना भ्रमणध्वनी तसेच ईमेल आडीवर सुचविण्यात आले आहे.
गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस चालकाच्या 10 पदांकरीता शारीरीक चाचणी परीक्षा आणि वाहन कौशल्य चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान शारीरीक चाचणी परीक्षा आणि वाहन कौशल्य चाचणी मध्ये गुण प्राप्त करून लेखी परिक्षेकरीता पात्र’ असलेल्या उमेवारांची यादी www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असुन सदर लेखी परिक्षा 19 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता पांडु आलाम सभागृह, पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आली आहे. सदर परिक्षेकरीता 124 उमेदवार पात्र असुन उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन गडचिरोली पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.