लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १७ जुलै :-राज्याचे गृहमंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असतांना गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेस दुपारच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली या चकमकीत एक पोलीस अधिकारी व एक सीसीसी जवान जखमी झाले असून तब्बल 12 नक्षल ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई मानल्या जात आहे.
दरम्यान गृहमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चकमकीत यश प्राप्त केलेल्या C60 जवानांचे अभिनंदन करीत 51 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
छत्तीसगड सीमेजवडील वांडोली या गावात बारा ते पंधरा नक्षली तळ ठोकून असल्याच्या माहितीच्या आधारे आज सकाळच्या सुमारास गडचिरोली पोलीस दलाचे c60 जवान हे छत्तीसगड सिमेल जवळील च्या वांडोली गाव परिसरात शोधमोहीम राबवत असताना पोलीस चकमक उडाली
या चकमकीत डीव्हीसीएम लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम ठार झाला असल्याची माहिती असून इतर 11 नक्षलवाद्याची ओळख पटवण्याचे काम गडचिरोली पोलीस दलामार्फत सुरू आहे
घटनास्थळावरून 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 7 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या यशस्वी मोठ्या अभियानासाठी c60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक जवान गोळी लागून जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविले आहे