नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्या तीन व्यक्तींच्या वारसांना १२ लाखांची मदत !

0
436

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२२ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनेत मृत झालेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकाच्या वारसांना नैसर्गिक आपत्तीने प्रत्येकी ४ लक्ष असे एकूण १२ लक्ष रुपये मदतीचे धनादेश आज त्यांच्या घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

याच महिन्यात दिनांक ९ जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून मयत झालेले अमित डोलू तीम्मा यांचे वारस वडील दोलू लुला तीम्मा यांना, २ जुलै रोजी मौजा जीवनगट्टा येथील चंदू गिरमा पोरटेत हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते, त्याचे वारस पत्नी नामे प्रेमीला चंदू पोरतेट यांना तसेच मौजा मरपल्ली येथील अंकुश पांडू कुळयेटी हे दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मरपल्ली नाल्या जवळ पाण्यात पडुन वाहून जाऊन मृत झाले होते. त्यांचे वारस आई नामे सुमन पांडू कुळयेटी यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आले.

यावेळी आदित्य आंधळे गटविकास अधिकारी, सचिन कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी , पी. एन . उसेंडी तलाठी एटपल्ली पी. डी. आत्राम तलाठी तोडसा , देवाजी गावडे कोतवाल , सुरेश दुर्गे कोतवाल, सचिन गेडाम कोतवाल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here