कर्जाला कंटाळुन विवाहिताची गळफास घेवुन आत्महत्या

0
837

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली, दि. २७ जुलै :- पतसंस्था तसेच बॅंकेच अंगावर कर्ज असल्याने कर्जाला कंटाळुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना गडचिरोली शहरातील लांझेडा येथे २६ जुलै २०२४ रोजी सांयकाळच्या सुमारास घडली. जगदीश अंबादास निकोडे ( वय ४० ) मु. बोदली ता.जि.गडचिरोली असे गळफास घेतलेल्या विवाहिताचे नाव आहे. कर्जामुळे आत्महत्या केल्याने गडचिरोली शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक जगदीश निकोडे हा विवाहित असुन तो आपल्या पत्नीसह लांझेडा येथे राहत होता. गुण्यागोविंदाने संसार चालु असतांना त्याच्यावर राधाकृष्ण महीला नागरी सहकारी पत संस्था मर्या गडचिरोली तसेच महाराष्ट्र बॅंकेचे कर्ज होते. मात्र त्याला सदर कर्ज परतफेड करण्यासाठी अडचणी येत होत्या. दरम्यान त्याला बॅंकेकडून व पतसंस्थेकडून वारंवार नोटीस येत असल्याने तो नेहमी चिंतेत राहत होता. त्याच कर्जाला कंटाळून पत्नी घरी नसतांना राहत्या घरी जगदीशने गळफास घेवुन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलीसांना होताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
पतीच्या अशा मृत्यूने पत्नीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here