लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २७ : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मुल्य, नेतृत्व गुण वाढविण्याकरीता तसेच मुलभुत अधिकार व कर्तव्याची जाणीव व्हावी, वन वोट वन व्हॅल्यु या मृल्यानुसार मतदानाचे मानवी जिवनात किती महत्व आहे याची जाणीव करण्याच्या उद्देशाने संजीवनी विद्यालयात शालेय मंत्रीमंडळाची स्थापना बुधवार २४ जुलै २०२३ करण्यात आली. विद्यार्थी दशेत मताधिकार तथा निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती व्हावी याकरीता शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र भैसारे यांनी व जेष्ठ शिक्षीका कु. तृप्तो मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. निवडणूक प्रमुख म्हणुन राकेश यामावार तर निवडणूक निरीक्षक म्हणून कु. हर्षाली ढोणे यांच्या देखरेखेखाली विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहपूर्वक वातावरणात निवडणूक प्रक्रीया पार पडली.
सदर निवडणूकीमध्ये शालेय मुख्यमंत्री नमन नरोटे वर्ग १० वा, उपमुख्यमंत्री कु. समिक्षा महल्ले वर्ग १० वा, आरोग्य मंत्री कु. श्रुती गडपल्लीवार वर्ग ९ वा, स्वच्छता मंत्री भुषन रोळे वर्ग १० वा, सांस्कृतीक मंत्री कु. सिमरन बांबोळे वर्ग ९ वा, मुलींची प्रतिनिधी कु. वैदीका कोसरे वर्ग १० वा, पर्यटन मंत्री मोहीत नन्नावरे वर्ग १० वा, शिक्षण मंत्री कु. देवी धुडसे वर्ग ९ वा, क्रिडा मंत्री नयन राऊत वर्ग १० वा. पोषन आहार मंत्री पियुष मोहले वर्ग ८ वा हे उमेदवार एकमताने विजयी झाले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र भैसारे यांनी लोकशाही पद्धतीने शपथ घेतली.