–अशा स्वागताची तुम्ही ठेवणार काय अपेक्षा ?
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३१ : गडचिरली जिल्हा हा विविधतेने नटलेला आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात मात्र बाहेर गावावरून येणाऱ्यांची विशेषतः नागपूरहून येणाऱ्या पाहुण्यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केले जात आहे. त्याची अपेक्षा तुम्हीही ठेऊ शकणार नाही हे मात्र नक्की.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकास कामे सुरू आहेत. गडचिरोली ते मूल, चामोर्शी मार्गे वगळता धानोरा व आरमोरी मार्गावर अद्यापही सिमेंट काँक्रिट रोड तयार होणे बाकी आहे. तर गडचिरोली शहरातून आरमोरी कडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून याकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पावसाचे दिवस असल्याने भल्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने त्या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना उमजत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
विषेतः नागपूर वरून येणारे पाहुणे मंडळींची तर गडचिरोली शहरात आगमन होताना खरपुंडी नाका नजीक पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांनी स्वागत केले जात आहे. येथील मोठ मोठे खड्डे हे खरपूंडी नाका ते इंदिरा गांधी चौकापर्यंत असल्याने नागरिकांना या खड्यांचा सामना करावा लागत आहे. तर वाहनधारकांना खड्डे चुकवत कसाबसा इंदिरा गांधी चौक गाठावे लागत आहे. त्यामुळे गडचिरोली शहरात अशा स्वागताची तुम्हीही अपेक्षा ठेवणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून येथील लोकप्रतिनिधी, प्रशासनाला नागरिक जाब विचारताना दिसत आहे. विविध टॅक्स चा भरणा करूनही अशा पद्धतीचे रस्ते नशिबी भेटत असल्याची बोंबही नागरिक ठोकत आहे. नागपूरहून येणाऱ्या मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना या खड्यांचा त्रास होत नसेल काय ? हवाईवारी करणाऱ्या पालकमंत्र्यांना याबाबत काय कळणार अशीही बोंब नागरिक करतांना दिसत आहे.
आरमोरी पर्यंत विविध ठिकाणी खड्डेच खड्डे
गडचिरोली येथून आरमोरी पर्यंत जात असताना या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. देऊळगाव नजीक तर खाद्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. अपघात झाल्यास प्रशासन व सबंधित विभागाला जाग येणार काय असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.