बांधकाम उपविभाग कार्यालय, धानोरा येथील कनिष्ठ अभियंता
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.1 ऑगस्ट :- बांधकाम उप विभाग कार्यालय, धानोरा, येथील कनिष्ठ अभियंता अक्षय मनोहर अगळे, वय-२९ वर्षे, (वर्ग-३) यांना १,७०,०००/- रुपये लाच रक्कमेची पंच साक्षीदारा समक्ष सुस्पष्ट मागणी केल्याने अॅन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने आज रोजी ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्त, तक्रारदार यांस दि. १९/६/२०२४ व दि. २७/६/२०२४ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता आलोस अक्षय मनोहर अगळे, वय २९ वर्ष, पद-कनिष्ठ अभियंता, जिल्हा परीषद बांधकाम उप विभाग धानोरा, जिल्हा गडचिरोली यांनी आपले लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःचे आर्थिक फायद्या करीता वाम व भ्रष्ट मार्गाने तक्रारदारास सुधारणा केलेल्या कामाचे एमबी, देण्याकरीता १,७०,०००/-रू लाच रक्कमेची पंच साक्षीदारा समक्ष सुस्पष्ट मागणी केली आहे. तकारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तकार नोंदविली.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवी अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार सुधारणा केलेल्या कामाचे एम. बी. देण्याचे करीता १,७०,०००/-रू लाच स्क्कमेची पंच साक्षीदारा समक्ष सुस्पष्ट मागणी केल्याने त्यांचे विरुध्द पोस्टे, धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अक्षय मनोहर अगळे घराची झडती घेण्यात आली. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, मा. संजय पुरंदरे अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांचे पर्यवेक्षणात पो. नि. श्रीधर भोसले, राजेश पदमगिरीवार, संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके, प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.