महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष पवार यांनी गडचिरोली येथे दिली भेट

0
145

– आगामी राज्य अधिवेशनाचां घेतला आढावा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी नुकतीच २२ जुलै रोजी गडचिरोली येथे भेट घेत जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या राज्य अधिवेशनाच्या आता पर्यंत झालेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासह राज्य संघटनेचे विभागीय संघटन सचिव विनोद पन्नासे (चंद्रपुर), राज्य कार्यकारणी सदस्य चंद्रकांत घाटोळ (नांदेड) हे सुध्दा उपस्थित होते.
२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन असल्याने त्याचा आढावा घेण्याकरिता ते गडचिरोली येथील संघटनेची भेट घेत आता पर्यंत झालेल्या तयारीची माहिती घेतली व झालेल्या कामावर समाधान व्यक्त कले तसेच पुढे करावयाच्या कामा संदर्भात मार्गदर्शन केले तसेच नियोजित कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी केली. दरम्यान जिल्ह्यात पूरस्थिती असतांनाही त्यांनी भेट दिल्याने गडचिरोली संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
आढावा बैठकीला गडचिरोली वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष अनिल बाळेकरमकर, सचिव लोमेश बांबाळे, कोषाध्यक्ष प्रशांत वाढई, सह सचिव मारोती बाळेकरमकर, प्रसिद्धी प्रमुख अंकुश बोबाटे, सदस्य राजेन्द्र गव्हारे, संजय आकरे, रविंद्र कांबळे, संदिप आकरे, देवेंद्र बारापात्रे, आदि सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here