लोकवृत्त न्यूज
सावली १४ ऑगस्ट: सावली तालुक्यातील केरोडा येथील शेत शिवारात वीज कोसळून एका ४० वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. तसंच एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दुपारी घडली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सध्या चंद्रपूर जिल्ह्यात धान रोवनी हंगाम सुरू आहे. शेतात रोवनी करण्यासाठी गेले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि चित्रकला सुधाकर भुरसे (४० वर्ष) यांच्या अंगावरही वीज कोसळली. या दुर्घटनेत चित्रकला सुधाकर भुरसे यांचा जागीच मृत्यू झाला, तर शालू भास्कर भुरसे , हे जखमी झाले. उपचारासाठी गडचिरोली येथे हलवण्यात आलं आहे.
मृत चित्रकला सुधाकर भुरसे यांच्या पश्चात पती, दोन मुले आहे. घटनास्थळी सावली पोलीस आले असून सदर घटनेचा पंचनामा सुरू असुन वीज कोसळून शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याने केरोडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.