गडचिरोली : चौकात झगमग मात्र रस्त्यावर अंधार

0
344

– नगर परिषदेचा प्रताप

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१५ ऑगस्ट : गडचिरोली नगर परिषदेचा आणखी एक प्रताप पुढे आला आहे. शहरातील मुख्य चौकात झगमग करण्यात आली आहे. मात्र मुख्य रस्त्यावर मात्र अंधार पहावयास मिळत असल्याचे चित्र आहे.
गडचिरोली शहरातील मुख्य चौकात तसेच मुख्य मार्गावर नेहमीच वर्दळ असते. नगर परिषदेमार्फत नव्याने पथदिवे लावण्यात आले आहे. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य चौकात झगमग करण्यात आली आहे याबाबत नागरिकांनी आनंद व्यक्त केला असला तरी मुख्य मार्गावरील पथदिवे मात्र बंद स्थितीत असल्याने अंधार पसरला आहे. अनेक ठिकाणचे पथदिवे बंद स्थितीत पहावयास मिळत आहे. नागरिक रात्रीच्या सुमारास फिरावयास निघतात, अश्याच या मार्गावर वाहनांची वर्दळ नेहमीच असते. नगर परिषदेमार्फत लावण्यात आलेल्या पथदिवे बंद असल्याने मात्र रस्त्यावर अंधार पसरलेला आहे. त्यामुळे चौकात जरी झगमग केली असली तरी मार्गावर अंधार पसरला असल्याने त्याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते आहे. पुन्हा एकदा नगर परिषदेचा हा प्रताप शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Nagar Parishad gadachiroli #har ghar tiranga )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here