कोलकाता येथील बलात्कार पीडित महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्या : डॉ.सोनल चेतन कोवे

0
416

कोलकाता येथील बलात्कार पीडित महिला डॉक्टरची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्या : डॉ.सोनल चेतन कोवे

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १७ ऑगस्ट :- कोलकाता शहरातील के आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला डॉक्टरच्या अमानुष बलात्कारानंतर संपूर्ण देश हादरला आहे. बलात्कार करून या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशभरातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी गडचिरोली येथील डॉ.सोनल चेतन कोवे यांनी केली आहे.
कोलकाता येथील के आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील बलात्कार पीडित महिला डॉक्टर सुवर्मा गोस्वामी यांच्या अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सोनल कोवे यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार १६ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कॅंडल मोर्चा काढण्यात आला.
यावेळी इंडियन डेंटल असोसिएशन, गडचिरोली असोसीएशन ऑफ मेडिकल प्राकट्टीशनर, इंडियन मेडिकल असोसिएशन, मॅग्मो संघटना, गडचिरोली नर्सेस असोसिएशन,जंगो रायताड महिला संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.
कर्तव्यावर असतांना एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करणाऱ्या क्रुरकर्मी, निर्दयी गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी व पीडित महिला डॉक्टर सुवर्मा गोस्वामी यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी कॅंडल मार्च व श्रध्दांजली वाहिन्यात आली. या आंदोलनात शहरातील नामवंत डॉक्टर, परिचारिका, तसेच शहरातील महिला व पुरुषांनी सहभागी झाले. डॉ सोनल कोवे, दंत व मुखरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Kolkata #Doctor #har ghar tiranga )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here