गडचिरोली -आलापल्ली व्हाया छत्तीसगड रेल्वे धावणार

0
1640

– नवीन रेल्वे लाईन मंजूर

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली,दि.१७:-  जिल्ह्यात वळसा येथे एकमेव असलेल्या रेल्वे चे जले आता जिल्ह्यात इतरही ठिकाणी पसरणार आहे. वडसा – गडचिरोली रेल्वे मार्गाला अनेक वर्षापासून मिळाली असतांना आता त्यात भर पडून गडचिरोली , आलापल्ली सिरोंचा , असरअली, भोपालपटनम, बिजापूर आणि बचेली (छत्तीसगड). 490 कि मी नविन रेल्वे लाईन मंजूर झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात रेल्वेचे जाळे आणखी पसरणार आहे.
याबाबतचे पत्रही प्रसिद्ध करण्यात आले असून नव्या रेल्वे लाईन ने जिल्ह्यातील रेल्वे मार्गाला आणखी चलाणा मिळून नव्या उद्योग व्यवसायांना भरारी मिळणार असल्याची अनेक स्तरातून बोलल्या जात आहे. सदर रेल्वे लाईन मंजूर झाल्याने जिल्ह्यातील सूरजागड लोहाखानीला याचा मोठा फायदा होणार असल्याच्या प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे.

 

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #gadchirolirailway #har ghar tiranga )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here