भाजपाने आ.डॉ .देवराव होळी यांना उमेदवारी द्यावी

0
83

२२ गावचे ग्रामसभा अध्यक्ष केसरी पा. मट्टामी यांची भाजपाकडे मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १९ ऑगस्ट :- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी हे स्वतः ग्रामसभा सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहेत.ते नेहमीच जिल्ह्यातील ग्रामसभांच्या सहकार्याच्या भूमिकेत काम करीत आहेत. त्यांनी आदिवासी समाजाच्या समस्या शासन स्तरावर मांडून निकालात काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. या परिसरातील रस्त्यांसाठी मागील ५० वर्षात कधी नव्हे एवढा निधी त्यांनी आणला असून मागील दहा वर्षात शंभर कोटी हून अधिक रूपयांच्या रस्त्याची कामे या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे आमदार डॉ. देवराव होळी यांना या परिसरातील ग्रामसभांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपाने त्यांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवार दिल्यास निवडणूक जिंकणे कठीण आहे. करिता प्रचंड जनसंपर्क असणारे व जिंकण्याची क्षमता असणारे आमदार डॉ. देवराव होळी यांनाच भारतीय जनता पार्टीने उमेदवारी द्यावी अशी मागणी पुसेर परिसरातील २२ गावांच्या ग्रामसभेचे अध्यक्ष केसरी पा. मट्टामी यांनी आदिवासी समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित आदिवासी समाजाच्या मेळाव्याच्या प्रसंगी केली.

या मेळाव्याला आमदार डॉ. देवराव होळी ,भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे, उपसरपंच विनोद कोंदामी, माजी सरपंच मारोती गावळे, डोनूजी हिचामी, इलाखा भूमिया, मारोती गावळे, विलास उईके, चंद्रकला आत्राम, गणुजी नरोटे ग्रामसभा सचिव मधुकर कोवासे, नामदेव मट्टामी, सुधाकर तुमरेटी, काशिनाथ उसेंडी, तुकाराम कुमरे, कोमटी नरोटे, शिवाजी हेडो, रामू हेडो, तसेच परिसरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here