आत्राम खुनात जनमिलिशिया सदस्य अटक
लोकवृत्त न्यूज
अहेरी दि. २१ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्रांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या व मौजा कापेवंचा ता. अहेरी येथील निरपराध इसम रामजी आत्राम याचे खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास काल दिनांक 20/08/2024 अटक केली.
सविस्तर वृत्त असे आहे की, काल दि.20/08/2024 रोजी उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा हद्दीतील भंगारामपेठा जंगल परिसरामध्ये उप-पोस्टे दामरंचा पोलीस पथक व सीआरपीएफ जी-9 बटा. चे जवान माओवाद विरोधी अभियान राबवित असतांना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असतांना आढळुन आल्याने पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांनंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे प्रमोद मधुकर कोडापे, वय 37 वर्षे, रा. भंगारामपेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मागील वर्षी दि. 24/11/2023 रोजी कापेवंचा येथील रामजी आत्राम रा. कापेवंचा ता. अहेरी जि. गडचिरोली याचा माओवादयांकडुन खुन करण्यात आला होता. त्यावरुन उप-पोस्टे राजाराम खां. येथे दाखल अप. क्र. 411/2023 कलम 302, 120(ब), 147, 148, 149, भादवि, सह कलम 3/27 भाहका मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास प्रभारी अधिकारी उप-पोस्टे राजाराम खां. यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.
जनमिलिशीया सदस्य म्हणुन काम करीत होता.
सन 2017 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून माओवाद्यांसाठी राशन आणून देणे, इतर साहित्य पुरविणे सेंट्री ड्युटी करणे, माओवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती माओवाद्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल माओवाद्यांना माहिती देणे तसेच माओवाद्यांचे पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता.
कापेवंचा येथील रामजी आत्राम नावाच्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– महाराष्ट्र शासनाने प्रमोद मधुकर कोडापे याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #gadchirolipolice #har ghar tiranga )