बदलापूर प्रकरणातील आरोपींवर सक्त कार्यवाही करा – डॉ. मिलिंद नरोटे

0
107

बदलापूर प्रकरणातील आरोपींवर सक्त कार्यवाही करा – डॉ. मिलिंद नरोटे

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २४ :- बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी व महाविकास आघाडीच्या नेत्यांची दूतोंडी भूमिका उघड करण्यासाठी बदलापूर प्रकरणातील आरोपीला कडक शासन होऊन पिडीतेला न्याय मिळवण्यासाठी मुक धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टी गडचिरोली यांच्या वतीने इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे करण्यात आले.
आंदोलनावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आपण या प्रकरणाबद्दल जागरूक राहू आणि लोकांना जागृत करू तसेच या प्रकारच्या सर्व प्रकरणात दोषींना कठोर कार्यवाही व्हावी याचा पाठपुरावा करण्यासाठीची शपथ घेण्यात आली.
यावेळी डॉ. मिलिंद नरोटे यांनी आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी केली .

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजपा महामंत्री गोविंद सारडा, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनिल तिडके, डॉ. चंदा कोडवते, पायल कोडापे, वर्षा शेडमाके, अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे, यशवंत झरकर ता.नेते, बंडू झाडे ता.महामंत्री, मंगेश रणदिवे, विशाल हरडे, धनंजय सहदेवकर, अनिकेत विश्वरोजवार, सागर हजारे, श्याम सलामे, सत्यजित सरदार, नरेंद्र हजारे, हर्षल गेडाम, संजय देवोजवार व भाजपा – भाजपा युवा मोर्चाचे इतर सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here