मानव सेवेचे व्रत घेवून निस्वार्थ भावनेने सेवा कार्य हे निरंकारी मिशनची ओळख : आ. कृष्णा गजबे
लोकवृत्त न्यूज
देसाईगंज : मानव सेवेचे व्रत घेवून निस्वार्थ भावनेने सेवा कार्य हे निरंकारी मिशनची ओळख आहे असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. ते संत निरंकारी मंडळ शाखा वडसा देसाईगंज च्या वतीने शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी संत निरंकारी सत्संग भवन आरमोरी रोड देसाईगंज येथे भव्य रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते.
या रोगनिदान शिबिरात हृदयरोग, कॅन्सर, पचन किया, मधुमेह इ. सर्व दुर्धर आजारांवर ३२५ रुग्णांची तज्ञांकडून तपासणी व उपचार डॉ. पुरुषोत्तम आरोरा, M.D हृदयरोग तज्ञ, हुबली, कर्नाटक, डॉ. मनीष मोतीलाल जेठानी, M.S.सर्जिकल ऑन्कोला (कॅन्सर) मुंबई, डॉ. कंचन सच्चानन्दानी, M.S सर्जिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी, मुंबई, डॉ. अंकिता केणी, मुंबई, डॉ. कु. प्रिया मोतीलाल जेठानी, पुणे, डॉ. कोसे, डॉ. गौरव सहारे, डॉ. सोहेल खान तसेच ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य तपासनी कर्मचारी कु. करिश्मा हर्षे, प्रयोगशाळा तंज, कु. ज्ञानेश्वरी दुधबडे, परिचारिका इ. यांनी सक्रिय सहभाग घेवून तपासणी व उपचार पूर्ण केला.
शिबीराचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी किसन नामदेवे, झोनल इंचार्ज, संत निरंकारी मंडळ यांचे अध्यक्षते खाली व आसाराम निरंकारी, संयोजक, हरिषकुमार निरंकारी, क्षेत्रीय संचालक, सेवादल, माधवदास निटांकरी, मुखी कुरखेडा, व सर्व तज्ञ डॉक्टर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन पर सबोधनात मानवसेवेचे व्रत घेवून निस्वार्थ भावनेने सेवाकार्य हे निरंकारी मिशन ची ओळख असल्याचे त्यांनी नमूद करून मिशनच्या रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपन इ. सेवाकार्या ची मुक्त कंताने प्रशंसा केली.
रोगनिदान शिबीरासाठी उत्तम व्यवस्था करण्यांत आली होती. औषधीचे मोफत वितरण करण्यांत आले व सर्वांसाठी महाप्रसादाची ही व्यवस्था करण्यांत आली होती. शिबीराला यशस्वी करण्यांसाठी सेवादलचे सर्व स्त्री पुरुष सदस्यांनी गणवेषात सेवा दिल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना हरिष निरंकारी तसेच संचालन नानक कुकरेजा व आभार प्रदर्शन पुरुषोत्तम डेंगानी यांनी केले.
यावेळी सर्व तज्ञ डॉक्टरांना निरंकारी मिशन चे काही प्रकाशन पुस्तके भेट करण्यांत आली. शिबीराला यहास्वी केल्याबद्दल व सहकार्याबद्दल किटान नागदेवे, झोनल इंचार्ज व संत निरंकारी मंडळाचे वडसा शाखेने सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Saint Nirankari)