विविध मागण्यांसाठी बीआरएसपीच्या नेतृत्वात विराट मोर्चा
लोकवृत्त न्यूज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.२४ :- विविध मागण्यांसाठी बीआरएसपीच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला.
बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.डॉ.सुरेश माने यांच्या नेतृत्वात गायरान-वनजमीन व इतर शासकीय जमीन अतिक्रमण धारकांना मालकीचा सातबारा मिळालाच पाहिजे, भूमिहीनाना जमिनी वाटप झाल्याचं पाहिजे, सरकारी नौकऱ्या मधील कंत्राटीकरण-खाजगीकरण बंद करून,सुशिक्षित बेरोजगारांना नौकऱ्या मिळाल्याच पाहिजे, SC-ST-OBC मुस्लिम आरक्षणाची व पदोन्नती आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, बहुजन समाजाला आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध योजणांची अंमलबाजवानी झालीच पाहिजे, SC-ST आरक्षण वर्गीकरण रद्द करून, क्रिमिलीयर ची अट रद्द झालीच पाहिजे या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढण्यात आला.
यावेळी अरविंद कांबळे, प्रदेश महासचिव, विजय शिनगारे जिल्हाध्यक्ष, अब्दुल अजीज अज्जू भाई वरिष्ठ नेते, अनामि मोरे युवा जिल्हाध्यक्ष, नवाब पटेल शहर अध्यक्ष, त्रिशरन गायकवाड कामगार शहर अध्यक्ष, शुभम नवगिरे विद्यार्थी शहर अध्यक्ष, निर्मला पेटारे जिल्हाउपाध्यक्ष, शेख फाजलोद्दीन मध्य शहर अध्यक्ष, विश्वजीत बागुल कन्नड अध्यक्ष, साहेबराव दाभाडे वैजापूर प्रभारी, कचरू निकाळे वैजापूर अध्यक्ष तसेच दीपक निकाळजे आंबेडकरी युवा नेते, सुभाष वाहुळे परभणी जिल्हाध्यक्ष, कांचनताई सदाशिवे, सामाजिक कार्यकर्त्यां, आनंद गाडेकर जालना शहर अध्यक्ष, शेख खाल्लेद, व्यापारी शहर अध्यक्ष, गौतम बनकर तालुका अध्यक्ष, गंगापूर, शेख लतीफ, शेख सलाम, मनोज साळवे वाळुंज अध्यक्ष, शुभम दुशिंग शहर अध्यक्ष, राजू गवारगुर शहर सचिव, गंगापूर, भगवान गर्दनमारे, कुंडलिक दळवीपूर्व उपाध्यक्ष, किसन भोसले पूर्व प्रभारी, नतिजा भोसले वैजापूर अध्यक्ष,इतर पदाधिकारी कार्यकर्ते, भूमिहीन, गायरान धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #brsp)