गडचिरोली एका जहाल माओवाद्याने केले आत्मसमर्पण

0
566

शासनाने जाहिर केले होते एकुण ०६ लाख रूपयांचे बक्षिस.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.३० :- आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. आज दि. ३० ऑगस्ट २०२४ शुक्रवार रोजी जहाल माओवादी केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम, एरिया कमिटी सदस्य, टेकनिकल टीम- वेस्ट सब झोनल ब्युरो, वय ४२ वर्ष, रा. कोसमी नं. १ ता. धानोरा, जि. गडचिरोली याने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

कार्यकाळात केलेले गुन्हे त्याचेवर आजपर्यंत एकुण ३४ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १८-चकमक, खून-०८ जाळपोळ- ०२ व इंतर ०६ गुन्ह्यांचा समावेश आहे
शासनाने जाहिर केलेले बक्षिस:- महाराष्ट्र शासनाने केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याचेवर ०६ लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस : आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याला एकुण ४.५ लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण २५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व जसवीर सिंग, कमांण्डट ११३ बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विश्वंभर कराळे, प्रभारी अधिकारी पोमके सावरगाव यांनी ही कामगिरी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणान्य माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here