लोकवृत्त न्यूज
नागपूर/गडचिरोली :- अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबाजी व प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे नारीन्याय आंदोलन २९ आगस्ट २०२४ गुरुवार रोजी सकाळी ११ ते ३ वाजता संविधानचौक, नागपूर येथे घेण्यात आला व रस्ता रोको आंदोलन करण्यात आला.
लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण लागू करावे तसेच महीलांवरील अत्याच्यार थांबविण्यासाठी कडक उपाययोजून महिला संरक्षणावर भर द्यावा अशी मागणी नारी न्याय आंदोलनात करण्यात आले.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्या डॉ.सोनल कोवे आणि गडचिरोलीतील महिला पधाधिकारांच्या शिष्टमंडळानी प्रत्यक्ष भेट घेऊन गडचिरोली विधानसभा मतदारसंघात ५०% महिला मतदार असुन स्त्री पुरुष समानतेच्या तत्त्वावर विधानसभा सदस्याची उमेदवारी देताना महिलांना प्राध्यान्याने देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. कांग्रेस पक्षात महिलांना नेहमीच अग्रणी स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महिला या कौटुंबिक, सामाजिक जबाबदारीसह राजकीय क्षेत्रात सुध्दा उत्तम कामगिरी बजावलेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांनी महिलांना संधी देऊन महिलांचा सन्मान करण्यात यावे अशी भूमिका महिला कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मांडलेली आहे तसेच गडचिरोली विधानसभा माहीला आरक्षित करण्यात यावी व उमेदवारी डॉ. सोनल कोवे यांना देण्यात यावी अशी मागणी प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले, अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबाजी, प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्याकडे केली. यावेळी महिलांच्या विविध समस्या व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. यावेळी लता मुरकुटे, पुष्पलता कुमरे, कवित भगत, पुष्पा कुमरे, लता पेदापल्लीवार, अर्चना जंगमवार, शारदा दामले, विभा पाल आणि मोठ्या संखेने काँग्रेस कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होत्या.