जि. प. शाळा आवळगाव येथील मुख्याध्यापक व्यंकटेश साखरे यांना निरोप
लोकवृत्त न्यूज
ब्रह्मपुरी :- जिल्हा परिषद शाळा आवळगाव येथील मुख्याध्यापक व्यंकटेश साखरे यांना नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला.
शुक्रवार ३० ऑगस्ट ला जि. प. शाळा आवळगाव येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय श्रावण ठाकरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक साखरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला समीती सदस्य/शिक्षक विद्यार्थी व आवाळगाव वासीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कोहपरे यांनी केले तर आभार शाळेतील उप मुख्यमंत्री कु, खुशी हीने मानले.