धक्कादायक : चालत्या बसमधून विद्यार्थी खाली कोसळले
लोकवृत्त न्यूज
मुल दि. ५ :- चालत्या बसचा दरवाजा निघून बसमधून विद्यार्थी खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज 5 सप्टेंबर रोजी चंद्रपूर मूल मार्गावर घडली.
एम एच 40 एम 8525 कमांकाच्या चंद्रपूर गडचिरोली या बस मध्ये सकाळच्या सुमारास जानाळा येथून काही विद्यार्थी बसमध्ये चढले. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने विद्यार्थी दरवाजा जवळ उभे होते. दरम्यान लोणी फाट्यानजीकच्या गतीरोधकावरून बस उसळल्याने अचानकपणे बसचा दरवाजा निघाल्याने दोन विद्यार्थी खाली कोसळले. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाले. लागलीच बस वाहकाने परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांना मुल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंदपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे.
अनेक विद्यार्थी स्वगावाहून दुसऱ्या गावाला शिक्षण घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडाळाच्या बसने प्रवास करीत असतात. विद्यार्थ्यांना विशेष सवलत या बसच्या माध्यमातून मिळत असल्याने अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत. बरामध्य विद्यार्थ्यांची गर्दीच गर्दी पहावयास मिळते मात्र अनेकदा विद्यार्थ्यांना उभ्याने प्रवास तर कधी दरवाजामध्ये उभे राहुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता निर्माण होत असते. सदर आजची घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या पालकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून विद्याथ्यांकरीता विशेष बस सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.