जलतरण स्पर्धेत प्रथमेश कोवेची विभागीय स्तरावर निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 8 :- गडचिरोली तालुक्यातील आनंदाबाई कुंभारे हायस्कूल मुडझा येथील इयत्ता 8 वीतील विद्यार्थी प्रथमेश सतीश कोवे याने जलतरण स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याने 50 मीटर फ्री स्टाईल, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, आणि 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
प्रथमेशच्या या यशाबद्दल त्याचे मार्गदर्शक बोरीकर सर यांचे विशेष कौतुक आहे. तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी आनंदाबाई कुंभारे हायस्कूलच्या संस्थापक आनंदाबाई कुंभारे मॅडम, मुख्याध्यापक भर्रे सर, सर्व शिक्षक वर्ग, तसेच मुडझा गावकऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि प्रथमेशला भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.