भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना प्राध्यान्य हेच भाजपचे धोरण : डॉ. मिलिंद नरोटे
लोकवृत्त न्यूज
धानोरा दि. १८ :- भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना प्राध्यान्य हेच भाजपचे धोरण आहे असे प्रतिपादन डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले. ते धानोरा येथे देवाभाऊच्या लाडक्या बहिणीचा, मातृशक्ती,नारीशक्ती भव्य महिला मेळाव्याचे आयोजन १६ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते यावेळी बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी राज्यसभा खासदार मायाताई नरोलिया या उपस्थित होत्या.
आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना प्रथम स्थान दिले आहे. त्यांच प्रमाणे महायुती सरकारच्या काळात जे लाडकी बहीण योजना, उज्वला योजना, बेटी बचाव बेटी पढ़ाओ पदवी पर्यंत मोफत शिक्षण, व इतर योजना आहेत. त्यात महीलावरच भार आणि सक्षम करण्याकरिता भाजप सरकारने विशेषत महिलांना प्राध्यान्य देण्यात आले त्यामुळे राज्यात महिलांचा सन्मान वाढत चाललेला आहे.
यावेळी माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वैशाली ताई चोपडे, चिटणीस महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सौ. रेखाताई डोळस, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. गीताताई हिंगे, महिला आघाडी महामंत्री सौ.सीमाताई कन्नमवार, महिला आधाडी धानोरा तालुकाध्यक्ष सौ. लताताई पुनघाटे, सौ. चंदाताई कोडवते, नगरसेवक चामॉर्शि आशिष पिपरे, व सहकारी उपस्थित होते.