गडचिरोली : वीज कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले, एक महिला ठार तर ११ जणी जखमी

0
335

– विजांच्या कडकडाटेसह मुसळधार पाऊस

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २० : शेतशिवारात निंदणाचे काम करीत असताना विजांचा कडकडाट सुरू झाला असता आपल बचाव करण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या नागोबा मंदिराकडे धाव घेतली असता वीज कोसळून १ महिला जागीच ठार तर सोबतच्या ११ जणी जखमी झाल्याची घटना आरमोरी तालुक्यातील डार्ली येथे शुक्रवार २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. विजया विलास गेडाम (४०) रा. नरोटी माल, असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सरिता श्रावण मडावी (५५) व संगीता प्रमोद गेडाम (२३) ह्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
आरमोरी तालुक्यातील डार्ली येथील लाकडे यांच्या धान शेतातील कचरा (निंदण) काढण्यासाठी जवळच असलेल्या नरोटी माल येथील ११ महिला गेल्या होत्या. निंदण सुरू असताना दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी विजा व पावसापासून बचाव करण्यासाठी निंदण करीत असलेल्या महिला रस्त्यालगतच्या नागोबा मंदिराच्या दिशेने धाव घेत आसरा घेतला. यावेळी काही महिला मंदिरात शिरल्या तर काही महिला दरवाज्यावर बाहेर होत्या. त्याचदरम्यान वीज मंदिर परिसरात कोसळली. यात विजया विलास गेडाम ह्या जागीच ठार झाल्या. तर इतर ११ जणी जखमी झाल्या. घटनेची माहिती घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना मिळताच त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आरमोरी येथे पाठविला. तर दोघी गणंभिर जखमी झालेल्या महिलांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर इतर ९ महिलांना वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते.
दरम्यान या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here