– न.प. मुख्याधिकारी यांना AIMIM तर्फे निवेदनातून मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातील अनेक भागात विविध समस्या असून शहरात समस्यांचा डोंगरच उभा झाला आहे. त्या समस्यांना धरून AIMIM तर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील शहरातील हनुमान वॉर्ड, नेहरू वॉर्ड, सुभाष, वॉर्ड, फुले वॉर्ड, माळी मोहल्ला,गांधी वॉर्ड चनकाई नगर, गोकुलनगर, गणेश नगर, विवेकानंद नगर, शाहु नगर, स्नेह नगर, लांझेडा, इंदिरानगर, सर्वोदय वॉर्ड, सोनापुर कॉम्प्लेक्स, अयोध्या नगर, शिक्षक कॉलनी, संपूर्ण वॉर्डातील नियमित नाल्या उपसा करून फवारणी करण्यात यावी. गडचिरोली शहरातील गृहकर कमी करण्यात यावे. अतिक्रमण धारकांना विना अट सरसकट घरकुल देण्यात यावे. शिवनगर, एकतानगर, वासियांना गृहकर लावून मूलभूत सोई सुविधा उपलब्ध करण्यात यावे, संपूर्ण शहरात सिमेंट रस्ते, नाल्या, बांधकाम करण्यात यावे,गोकुलनगर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांकरिता वाचनालय उभारण्यात यावे, गोकुल नगर येथिल पाणीटंकी च्या बाजूला असलेली ओपन स्पेसमध्ये गार्डन बनवून व्यायामाचे सामग्री देण्यात यावे, गोकुलनगर येथे पाणी टंकी जवळील हनुमान मंदिर समोरील खुल्या जागेवर गरिबांच्या लग्नासाठी व सामाजिक कार्यक्रमासाठी भव्य सभागृह उभारण्यात यावे, गडचिरोली शहरात नगरपरिषद स्वतंत्र दवाखाना उभारण्यात यावे. आदी मागण्यां धरून नगर परिषदचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिद्दुरकर यांना गडचिरोली शहरातील समस्या अवगत करून तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा AIMIM पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा AIMIM पक्षातर्फे निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, महीला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, महीला जिल्हा सचिव शमीना शेख, शगुप्ता शेख, नसीमा शेख, आदी उपस्थित होते.