यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४४० घरकुलांना मंजुरी

0
72

आमदार डॉ.देवराव होळी यांच्या प्रयत्नांना यश

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २४ :- मागील अनेक दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यातील बंजारा ,धिवर, भोई , केवट ,समाजातील घरकुल मंजूर व्हावे यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने प्रयत्न करीत होते. यामध्ये गडचिरोलीचे समाज कल्याण विभागाचे अधिकारी डॉ. सचिन मडावी यांनीही मोठे सहकार्य केले. यामध्ये अखेर यश मिळाले असून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ४४० घरकुलांना मंजुरी मिळाली असून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याकरिता आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्य शासनाचे आभार मानले असून केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान व्यक्त केले.
गडचिरोली, चामोर्शी व धानोरा तालुक्यातील सर्वाधिक घरकुलांचा समावेश आता लवकरच या समाजातील गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून घराचे बांधकाम सुरू करण्यास आवश्यक ती कारवाई पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here