– अखेर गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीच्या तिढा सुटला
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २६ : विधानसभा निवडणुकीच्या २०२४ च्या रणसंग्रामात गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारीबाबत भाजपकडून सस्पेन्स कायम होता. मात्र हा तिढा आता दूर झाला असून भाजपकडून या क्षेतत्राकरिता डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी जाहीर झाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी भाजपकडून विद्यमान आमदार डॉ. होळी, डॉ. मिलिंद नारोटे तसेच डॉ. उसेंडी यांचे नाव पुढे येत होते. विद्यमान आमदार डॉ. होळी यांनी तर डोक्याला बाशिंग बांधून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे सूचक वक्तव्य करीत मेळावा घेत अनेकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करीत रणशिंग फुंकले. मात्र आता गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी भाजपच्या वतीने डॉ. मिलिंद नरोटे यांचे नाव पुढे आले असून डॉ. नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या गोटात आनंद व्यक्त करण्यात येत असून विद्यमान आमदार डॉ. होळी यांच्या गोटात अस्ववस्था पहावयास मिळत असल्याचेही कळते.