आरमोरी विधानसभेत राम विरुद्ध कृष्ण अशी होणार लढत ; काँग्रेसकडून रामदास मसराम यांना उमेदवारी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २८: आरमोरी विधानसभा क्षेत्राकरिता भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादिमध्ये विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र काँग्रेसकडून या क्षेत्राकरिता उमेदवारीबाबतचा तिढा आता सुटला असून रामदास मसराम यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने या क्षेत्रात राम विरुद्ध कृष्ण अशी लढत होणार आहे.
आरमोरी विधानसभेकरिता भाजपककुन तिसऱ्यांदा विद्यमान आमदार यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसकडून माधुरी मडावी, गावड, सावसाकडे, आनंदराव गेडाम, छगन शेडमाके यांच्या सह शालू चिमुरकर हे सुद्धा इच्छुक होते. मात्र ऐनवेळी या सर्वाँना डच्चु देत रामदास मसराम यांना उमेदवारी दिल्याने आता आरमोरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढते होणार आहे.
गजबे गोटात धाकधूक वाढली
विद्यमान आमदार गजबे यांना जरी भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असली तरी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता. मसराम यांचे नाव आघाडीवर होते तेव्हा मसराम यांचेशी थेट लढत झाल्यास गजबेना कठीण जाणार अशा चर्चा गजबे गोटात व नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू होत्या. ऐन वेळी मसराम यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता गजबे गोटात धाकधूक वाढली आहे.