वरिष्ठांकडून मनधरणी : आमदार होळी नामांकन अर्ज मागे घेणार..

0
667

बंद दरवाजा आड आज बैठक ?

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.०३ : विधानसभा निवडणूक २०२४ जाहीर झाल्यानंतर गडचिरोली विधानसभा करिता इच्छुक असलेले आमदार डॉ. होळी यांना यंदा डावलून भाजपकडून डॉ. नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आमदार होळी यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल करीत भाजपपुढे आव्हान निर्माण केले. अशातच आता वरिष्ठांकडून आमदार डॉ. होळी यांची मनधरणी करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांद्वारे प्राप्त झाली असून ते नामांकन अर्ज मागे घेणार असल्याचे कळते. तर आज त्यासंदर्भात बंद दरवाजा आड बैठकही होणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांद्वारे प्राप्त झाली आहे.
आमदार डॉ. होळी यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी आपल्यालाच मिळेल या आशेने संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्र पिंजून काढला, विविध मेळावे आयोजित केले.. मात्र ऐनवेळी भाजपने त्यांची गोची करीत डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने आमदार डॉ. होळी गोटात अस्वस्थता निर्माण झाली. होळी यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणीही महायुती मधील मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली. दरम्यान आमदार डॉ. होळी हे अपक्ष निवडणूक लढविणार का अस प्रश्न निर्माण होत होता. आमदार होळी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेण्यात येईल असे सूतोवाच केल्याने कार्यकर्त्यांसह विधानसभा क्षेत्रात सस्पेन्स कायम निर्माण झाला असतानाच आता सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आमदार डॉ. होळी यांची वरिष्ठांकडून करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांद्वारे प्राप्त झाली असून ते नामांकन अर्ज मागे घेणार असल्याचे कळते. तर आज त्यासंदर्भात बंद दरवाजा आड बैठकही होणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांद्वारे प्राप्त झाली आहे. एकूणच बघता आमदार डॉ. होळी हे विधानसभा निवडणूक २०२४ करीता इच्छुक असतांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल करणे, त्यानंतर वरिष्ठांकडून मनधरणी होणे हा घटनाक्रम बघता आता आमदार होळी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here