आमदार होळींनी भाकरी फिरवली : पक्ष श्रेठींच्या आदेशाने उमेदवारी अर्ज घेतला मागे

0
549

आता डॉ. मिलिंद नरोटे यांचा करणार प्रचार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ०४ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात बंडखोरी चा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यान आज त्यावर अखेर विश्राम आला असून भाजप विरोधात बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेले आमदार डॉ. होळी यांनी अखेर पक्ष श्रेठींच्या आदेशाने भाकरी फिरवत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तर ते आता भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा प्रचार करणार आसल्याचे कळते.
भाजपचे विद्यमान आमदार डॉ. होळी हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना ऐनवेळी भाजपकडून त्यांना डच्चु देत डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने डॉ. होळी बंडखोरी करण्याच्या प्रतीक्षेत होते. अशातच डॉ. होळी यांनाच उमेदवारी देण्यात यावी याकरिता मित्र पक्ष व होळी समर्थकांनी मागणी करीत उमेदवारी न दिल्यास एकत्ररित्या राजीनामा देणार असा पवित्रा उचलला होता. तर गेल्या दोन दिवसात पक्ष श्रेठींच्या मध्यस्थीने आमदार होळी यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आल्याने अखेर आमदार होळी यांनी आज ४ नोव्हेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत बंडखोरीच्या चर्चेला विश्राम दिला आहे. आमदार होळी आता डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार असल्याची माहिती असून आमदार होळींच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झालेला असल्याचे दिसून येत आहे. आता आमदार होळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारात होळी हे पोषक ठरणार काय याकडे लक्ष लागले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here