गडचिरोलीत डॉक्टरांना राजकारणाची भुरळ :

0
196

: मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे भावी डॉक्टर काय पाऊल उचलणार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक आयोगाने जाहीर केली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसह उमेदवारांना चिन्हेही वाटप करण्याच्या प्रक्रिया पार पडल्या. अशातच गडचिरोलीतील राजकारणाची राज्यभरात चर्चा रंगू लागली असून गडचिरोली येथील डॉक्टरांना राजकारणाची भुरळ पडलेली दिसत आहे. त्यामुळे गडचिरोली येथे नुकतेच सुरू झालेल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे भावी डॉक्टर काय पाऊल उचलणार याकडे सुद्धा लक्ष लागले आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये मागील दशकभरातून आमदार म्हणून डॉक्टरांनी धुरा सांभाळली आहे. डॉक्टरांनी धुरा सांभाळली असली तरी वैद्यकीय सेवा मात्र बिमार दिसून येत आहे. वैद्यकीय सेवा जिल्हाभरात विविध मुद्द्याने चर्चिली असून आत्तापर्यंतच्या डॉक्टर आमदारांनी वैद्यकीय सोयी सुविधा कडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करावी राजकारणात पडू नये असे सुतोवाच विद्यमान खासदारांनी बोलून दाखवले होते तरीसुद्धा जिल्ह्यातील डॉक्टर रुग्णांची सेवा बाजूला सारून राजकारणात पाऊल टाकत आमदार बनण्याचे स्वप्न बघू लागले आहे. गेल्या दशकभरात डॉक्टर हे आमदार असताना सुद्धा जिल्ह्यातील आरोग्य सेवा डगमगल्याचे पहावयास मिळत असून आत्तापर्यंतचा डॉक्टर आमदार हा आरोग्य सेवेला बळकट करण्यात अपयशी ठरलेला दिसत आहे. तरीसुद्धा जिल्ह्यातील डॉक्टरांना आमदारकीचे स्वप्न पडून रुग्णांच्या सेवेला बाजूला सारत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. जिल्ह्यातील भोळी बाभळी जनता तसेच विधानसभा क्षेत्रातील मतदार या डॉक्टर उमेदवारांना घरी बसण्याची औषध मतदान स्वरूपात पाजून चांगलाच धडा शिकवणार अशी खमंग चर्चा विविध ठिकाणी ऐकावयास मिळत आहेत. नुकतेच गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज आगामी निवडणूक बघून सुरू करण्यात आले आहे. यावरूनही अनेकांनी श्रेय लाटले मात्र भावी डॉक्टरांनी आमदारकीसाठी उभे असलेल्या डॉक्टर उमेदवारांची प्रेरणा घेणार काय ? राजकारणात उतरतील की रुग्णांची सेवा करतील असाही प्रश्न डॉक्टर उमेदवारांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. गडचिरोली मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी भावी आमदार बनण्याची स्वप्न बघायचे की रुग्णांची सेवा करावी याबाबत जनमानसात संभ्रम निर्माण झालेला आहे. आतापर्यंतचा कोणताही डॉक्टर आमदार हा जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सुरळीत करू शकलेला नाही तरी देखील काही डॉक्टर हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपणच आमदार होणार याचे स्वप्न बघून मोठ्या ऐटीत वावरताना दिसत आहे . जिल्ह्यातील तसेच विधानसभा क्षेत्रातील मतदार या डॉक्टरांना नक्कीच घरी बसवणार अशी चर्चाही रंगू लागलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here