– केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी मागितली लाच
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१३ :- केलेल्या कामाचे बिल काढून देण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालय इमारत शाखेत कार्यरत वरिष्ठ श्रेणी लिपिक वर्ग ३ विक्की भास्कर प्रधान (३०) याने तब्बल १ लाख रुपयाची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई १२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. सदर कारवाईने पोलीस प्रशासनात एकचं खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वेगवेगळ्या प्रकारची ठेकेदारीचे कामे करतो. त्याची सेप्टीक टैंकर गाडी असून २०२३-२०२४ या कालावधीकरीता गडचिरोली पोलीस विभागातील संपुर्ण जिल्हयाचे पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस वसाहत, मुख्यालय, एसआरपीएफ व सिआरपीएफ येथील सेप्टीक टैंक सफाईचे टेंडर घेतले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय इमारत शाखेत कार्यरत वरिष्ठ श्रेणी लिपिक विक्की भास्कर प्रधान (३०) याने केलेल्या कामाचे बिल मंजूर झाल्यावर सदर बिल त्यांनी बनवून दिल्याबद्दल दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदारास केली होती. ५४ हजारांची देय लिपिकाला करूनही २४ ऑक्टोबर रोजी आणखी १ लाख रुपयांची मागणी फोनद्वारे तक्रारदारास केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली असता त्या अनुषंगाने तपासणी करून सापळा कारवाई कण्यात आली. त्यात लिपिक विक्की भास्कर प्रधान याने लाच रकमेची मागणी केल्याचे सुस्पस्ट झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(#lokvruttnews, #LOKVRUTT, #ACB GADACHIROLI)