केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या गडचिरोलीत

0
350

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या गडचिरोलीत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार १७ नोव्हेंबरला पूर्व विदर्भात येणाऱ्या गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत.
राज्यातच नव्हे तर देशात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. केंद्र सरकारने राज्यातीलच नाही तर देशातील माओवादी नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील नक्षलवाद बॅकफूटवर गेलेला दिसून येत आहे. यापूर्वीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिल्ह्याच्या अहेरी येथे येऊन गेले होते. महायुतीचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार कृष्णा गजबे अहेरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रचारार्थ ते गडचिरोली येथे येणार आहेत. या प्रचार सभेला जिल्ह्यातील नागरिकांनी शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ११.०० वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here