– आरोपीस अटक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि,३ :– पोलीस हे जनतेचे रक्षक मानल्या जाते मात्र गडचिरोली शहरात याच्या विपरीत घटना घडल्याने पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. शहरातील अल्पवयीन मुलीवर पोलीस नायकानेच लैगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. बंडु सुकरूजी गेडाम (वय 53) असे आरोपी नरधामाचे नाव तो पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे कार्यरत आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलीसांनी त्यास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे अल्पयीन मुली खेळत होते दरम्यान आरोपी बंडू गेडाम याने दोघांनाही आपल्या घरी नेत पिडीत मुलीवर लैगिक अत्याचार केला. सदर घटना २४ नोव्हेंबर रोजी घडली असून याबाबतची तक्रार पिडीतेच्या आईने २ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात दाखल केल्याने आरोपी असलेल्या बंडू गेडाम याच्याविरूध्द गडचिरोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. सदर घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली असून जनेतचे रक्षक असलेल्या पोलीसाकडून असे कृत्य होत असेल तर कोणावर विश्वास ठेवायचा, पिडीत मुलगी ही केवळ ७ वर्षाची असुन तिच्यासोबत असा प्रकार घडल्याने विविध स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे.