शर्ट च्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू
– एक जण गंभीर
लोकवृत्त न्यूज
वडसा दि. ०७ : दुचाकीने जात असताना शर्ट क्या खिशात असलेल्या अँड्रॉइड मोबाईल चा अचकान स्फोट झाल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना अर्जुनी मोरगावकडे जात असताना घडली. सुरेश संग्रामे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे तर नत्थु गायकवाड ( वय ५६) दोघेही रा. सिरेगावटोला असे जखमी झालेल्या सोबतच्याचे नाव आहे.
सुरेश संग्रामे हे वडसा तालुक्यातील कसारी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते अशी माहिती आहे. नत्थु गायकवाड व सुरेश संग्रामे हे दोघेही नातेवाईक असून ते दोघेही दुचाकीने नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावकडे जात होते. संग्रामे हे दुचाकी चालवीत होते तर गायकवाड हे मागे बसलेले होते. दरम्यान रस्त्यातच संग्रामे यांच्या शर्ट च्या खिशात असलेला अँड्रॉइड मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाला. अचानक स्फोट झाल्याने दोघेही खाली कोसळले, स्फोट झाल्याने संग्रामे यांची शर्ट जळाल्याने शरीर भाजले गेले. भाजल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर भंडारा येथील लक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मुख्याध्यापकाच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोबाईलचा स्फोट नेमका कसा झाला याचा शोध पोलीस करित आहे.