पोलीस शिपायांची गळफास घेऊन आत्महत्या
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.०८: पोलीस उप मुख्यालय प्राणहीता अहेरी येथे कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने अहेरी पोलीस संकुलच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ८ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. अविनाश सुंदरराव नाईकवाडे ( वय ३८) असे गळफास घेतलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उप मुख्यालय प्राणहीता अहेरी येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई अमर सुनील शेट्टे (वय २६) हे पोलीस संकुल इमारतीतील आपल्या खोलीच्या गॅलरीमध्ये चित्रपट बघत असताना
त्याच्या खोली मधली हॉल मध्ये असलेल्या सीलिंग फॅन ला पोलीस शिपाई अविनाश सुंदरराव नाईकवाडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अमर शेट्टे यांनी अहेरी पोलीस स्टेशन मध्ये कळवताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून कलम १९४ BNSS अन्वये मर्ग दाखल करुन तपासात घेतला आहे.
गळफास घेण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास अहेरीचे
पोनि स्वप्नील ईज्जपवार यांच्या नेतृत्वात पोउपनी सागर माने करीत आहे.