लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.०९ : गावाला जाणाऱ्या एका युवतीला दुचाकीस्वाराने लिफ्ट देवून छेडखानी केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीच्या अमिर्झा परिसारात घडली. सदर घटनेने खळबळ उडाली असून याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत युवती ही आपल्या लहान भावासोबत गावावरून अमिर्झाकडे जात होती. दरम्यान एका दुचाकीस्वारास तिने लिफ्ट मागीतली व अमिर्झा येथे सोडण्यास सांगितले असता दुचाकीस्वाराने अमिर्झा येथे न थांबवता जंगल परिसरात दुचाकी नेत युवतीशी छेडखानी केली. दरम्यान युवतीने त्याच्या तावडीतुन कशीबशी आपली सुटका करीत रस्ता गाठून एका इसमास थांबवून घडलेला प्रकार सांगीतला व घडलेल्या ठिकाणी जावून बघितले असता तिचा मावशीचा मुलगा व आरोपी मिळून न आल्याने पिडीतेने सदर घटलेला प्रकार आपल्या मामाला सांगून गडचिरोली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलीसांनी अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करीत त्याचा शोध घेत आहे. पिडीतेसोबत असलेला मावशीचा मुलगा काही तासातच पोलीसांना मिळून आला.
सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचे शहरासह जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटत आहे.