अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोलीचा जिल्हा अभ्यास वर्ग संपन्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : येथील महाराजा लॉन येथे नुकतेच २१ व २२ डिसेंबर दोन दिवसीय अभ्यास वर्ग अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोलीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या वेळी अभ्यास वर्गाचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून लॉर्ड मेटल्स चे एमडी कर्नल विक्रमजी मेहता यांनी मार्गदर्शन केले. या अभ्यास वर्गाला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती .
या अभ्यास वर्गात 14 सत्रांचा समावेश करण्यात आला होता. यात अ. भा. वि. प. ची सैद्धांतिक भूमिका, स्वामी विवेकानंद व अहिल्याबाई होळकर यांचा जीवनी विषयावर भाषण सत्र होते. महाविद्यालयीन कार्य, संपर्क, सक्षम शाखा,बैठक, अर्थसंकलन, वस्तीगृह संपर्क, आंदोलन, सोशल मीडिया,आयाम, कार्य,गतीविधि अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. समारोप सत्रात प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी जिल्हा समिती घोषणा केली तर गडचिरोली जिल्हा संघटन मंत्री राहु श्यामकुवर यांनी समारोपिय भाषण केले.
दरम्यान वर्षभर झालेले कार्यक्रम, आगामी कार्यक्रम युवक सप्ताह 3 ते 12 जानेवारी 2025 53 विदर्भ प्रांत अधिवेशन नागपुर 28,29,30 जानेवारी 2025 अधिवेशनाचे महत्त्व समजावून दिले. अशा विविध विषयावर बोलतांना कार्यकर्ते व विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली. हा अभ्यास वर्गात प्रांत कार्यालय मंत्री देवाशिष गोतरकर, गडचिरोली विभाग प्रमुख प्रा.धर्मेंद्र मुनघाटे, जिल्हा संघटनमंत्री राहुल श्यामकुवर प्रांत सोशल मीडिया संयोजक जयेश ठाकरे, प्रणय मस्के, जय टोंगे, विकास बोदलकर, संकेत मस्के, करण चौधरी, दिक्षा पिपरे, पूनम कुंभरे, वैष्णवी दरवडे,ओमप्रकाश तरार व अन्य अ. भा. वि. प.कार्यकर्ते उपस्थित होते.