– चंद्रपूर गुन्हे शाखेची कारवाई
लोकवृत्त न्यूज
मुल : दोन दिवसांपूर्वी मुल शहरात एका वीस वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतीने फिरवीत चोवीस तासाच्या आत आरोपी व त्याच्या एका विधीसंघर्षित साथीदारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने अवळल्या आहेत.
मुल शहरात दोन दिवसांपूर्वी एका युवकाची भरदिवसा खून केल्याची थरारक घटना घडली. याप्रकरणी आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे विविध पथके तयार करून २७ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा घडलेपासुन अथक प्रयत्नाने सातत्याने आरोपींचा शोध चंद्रपूर व लगतच्या जिल्हयात घेत असतांना गुन्हयातील मुख्य आरोपी राहुल सत्तन पासवान (२० वर्षे) रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५. मुल, ता.मुल.जि. चंद्रपूर, त्याचा साथीदार अजय दिलीप गोटेफोडे (२२ वर्षे ) रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५, मुल, ता.मुल.जि. चंद्रपूर व विधीसंघर्षित बालक यास २८ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतुन ताब्यात घेण्यात आले. पुढील कार्यवाही मुल पोलीस करीत आहे.