– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
लोकवृत्त न्युज
चंद्रपुर दि.०३: जिल्ह्यात अवैध ड्रग्स, गांजा अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु असून २ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विक्रीकरीता दुचाकीने जात असलेल्या इसमांना रंगेहाथ पकडत त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहन व
१३.८३५ कि.ग्रॅम गांजा किंमत १,९५,००० रूपये, तसेच दुचाकी किंमत ५०,००० असा एकुण २,४५,००० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देवराव माणिकराव केसगिर (वय ५०), रा. पल्लेझरी, ह.मु. रा. शेनगांव ता. जिवती जि. चंद्रपुर, दिनकर शंभु कुळसंगे, (वय ५०), धंदा मजुरी, रा. खडकी, ता. जिवती, जि.चंद्रपुर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.
चंद्रपुर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, गांजा अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने देवराव केसगिर हा राजुरा येथे गांजा विक्री करिता येणार आहे अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पथक रवाना होवून पोस्टे राजुरा हद्दीतील भेंडवी फाटा येथे सापळा रचून असताना देवराव केसगिर हा दुचाकीने येत असतांना त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या पोत्यामध्ये एकुण १३.८३५ किग्रॅम गांजा आढळून आल्याने त्याच्यावर व त्यासोबत असल्यालय व्यक्तीविरूद्ध कलम ८ (क), २१ (ब) ii (ब), २९ एन.डी.पी.एस. प्रमाणे पोलीस स्टेशन राजुरा येथे गुन्हा दाखल करून पुढिल तपासकामी पोलीस स्टेशन राजुरा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक, पोस्टे गडचांदुर यांचे नेतृत्वात सपोनि. दिपक काँक्रेडवार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोहवा. किशोर वैरागडे, दिपक डोंगरे, नापोअं. संतोष येलपुलवार, पोशि. गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, चापोहवा. दिनेश आराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.