पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करा

0
126

गडचिरोलीत हत्येचे तीव्र पडसाद, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.९ : छत्तीसगडच्या बिजापूर येथील NDTV व बस्तर जॅक्शन चे पत्रकार मुकेश चंद्रकार यांची निघृण हत्या केल्याची घटना ४ जानेवारी रोजी उघडकीस आली. या या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. सदर घटना अतिशय निंदनीय असून गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येत सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी आज 9 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
गडचिरोली जिल्हयात रेती , मुरूम माफीया , दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृतांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये .महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. १९ दिनांक ८ / १० / २०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदि मागण्याकरीता गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून जिल्ह्याधिकारी अविशांत पडां व जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांना मागण्याचे निवेदन यांच्या मार्फतीने देशाचे महामाहिमी. राष्ट्रपती महोदया , पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा ,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री छत्तीसगड , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस आदिना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
सदर मोर्च्यात पत्रकार प्रा. मुनिश्वर बोरकर , व्येंकटेश दुडमवार , लोकमत पत्रकार संजय टिपाले , सुरेश पद्मशाली , मुकुंद जोशी , उदय धक्काते , हेमंत डोर्लीकर , प्रल्हाद म्हशाखेत्री ,प्रकाश ताकसांडे , प्रकाश दुबे ‘जगदिश कन्नाके , मारोती भैसारे ‘ विलास ढोरे , सुरज हजारे ‘राजरतन मेश्राम , प्रा. दिलीप कवरके , नाशिर जुम्मनशेख , हेमंत हुनेदार ‘ महेश सचदेव , ‘दिनेश बनकर , कृष्णा वाघाडे,हस्ते भगत , नाझिर शेख , भाविकदास कळमकर , मुकेश हजारे , संदिप कांबळे , विनोद कुळवे , किशोर खेवले , सोमनाथ उईके ‘ निलेश सातपुते , श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे ,जयंत निमगडे ‘ हर्ष साखरे , कबिर निकुरे , प्रमोद राऊत , विजय शेडमाके , टावर मडावी , उमेश गझपल्लीवार , पुंडलिक भांडेकर ,अनुप मेश्राम , श्रावण वाकोडे , कालिदास बुरांडे , धनराज वासेकर , विलास वाळके. ‘गोर्वधन गोटाफोटे , रवि मंडावार , राजेश खोब्रागडे ‘चोखोबा ढवळे ‘सतिस ढेभुर्णे ‘गेडाम , धम्मपाल दुधे ‘ नाजुक भैसारे , रेखाताई वंजारी , विजयाताई इंगळे , तिलोतमा हाजरा आदि साहित जिल्हयातील दिडसे पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here