तलावात सुरू असेलल्या शाळा बांधकामाला गावकऱ्याचा विरोध
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील तलावाच्या पोटात नवीन शाळा इमारतीचे सुरु केलेले बांधकाम रद्द करून सुरक्षित जागेवर बांधकाम करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत गावकऱ्यांनी ०९ जानेवारी रोजी केली तसेच त्याबाबतच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली,संवर्ग विकास अधिकारी प.स. चामोर्शी.कार्यकारी अभियंता (सर्व शिक्षा अभियान) जिल्हा परिषद गडचिरोली यांना गावकऱ्यांनी दिले.
चामोर्शी तालुक्यातील गटग्रामपंचायत सोमनपल्ली अंतर्गत येनापुर जि.प. शाळेच्या नविन इमारतीचे बांधकाम मंजुर झाले असल्याने ग्रामपंचायत सरपंच व सचिव यानी पाच महिन्या पूर्वी सरपंच निलकंठ निखाडे यांनी वनविभागाच्या दुर्गापूर हद्दीमध्ये तलावाच्या पोटात खोदकाम करून शाळा बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी सुध्दा गावक-यांनी तलावाच्या पोटात शाळा इमारतीचे बांधकाम करण्यास विरोध करून बांधकाम थांबविले होते.
परंतु परत त्याच ठिकाणी तलावाच्या पोटात मागील बांधकाम केलेल्या जागेच्या बाजुला परत ले ऑऊट देवून बांधकामा करीता सुरुवात केलेली आहे.
सदर या नवीन शाळा ईमारतीचे तलावाच्या पोटात बांधकाम केल्यास तलावात पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होउन तलावात पाणी राहत असल्यान मुलांच्या जिवास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर जागा दलदलीची असल्याने इमारतीचे बांधकाम सुध्दा कोसळण्याची शक्यता आहे. तसेच तलावा खाली शेतकऱ्यांची शेती असुन शेतीतील धान पिकाचा उत्पन्ना घेवुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करित आहे. सदर इमारतीमुळे तलावाची पार फोडण्याची पाळी आल्यास शेतकऱ्यांची उपासमारीची पाळी येऊ शकते. या बाबीचा विचार करून दुसऱ्या सुरक्षीत ठिकाणी शाळेच्या ईमारतीचे बांधकाम करण्यात यावे, यापूर्वी सुध्दा सरपंच व सचिव संगणमत करून ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार केल्याचे अनेक तक्रारीसुध्दा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये करण्यात आलेले आहे. तरी आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. असा आरोपही पत्रकार परिषद मध्ये पालक आणि गावकर्यांनी केला आहे.
सदर ठिकाणी बळजबरीने बांधकाम केल्यास शाळेतील विद्यार्थीयांच्या जीवास धोका असून काही अपरिहार्य घटना झाल्यास याला ग्राम पंचायतचे सरपंच आणि सचिव तसेच तलावाच्या पोटात बांधकाम करण्यास मंजुरी देणारे प्रशासकिय अधिकारी हेजबाबदार राहतील.तलावाच्या पोटात होणारी नव्याशाळा इमारतीचे बांधकाम तात्काळ यांबविण्यात यावे व दुसया ठिकाणी सुरक्षित जागेवर शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात याद, अशी सर्व गावकरी च विद्यार्थी पालकाची मागणी आहे.
पत्रकार परिषदेला सुरेश विठोबा गुंतीवार,राजू येगोलपवार, राहुल येगोलपवार, गमतीदास राऊत, आदित्य जाधव, हनुजी कन्नाके, शांताराम कुमरे, किशोर गोपवार, मोहन बंडावार तथा पालक व गावकरी मंडळी उपस्थित होते.