मेहा बुजरुक येथील जि.प. शाळेचा कार्यभार ५ शिक्षकांवर ; विद्यार्थ्यांचे नुकसान

0
67

– अतिरिक्त शिक्षक न दिल्यास शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा

लोकवृत्त न्यूज
सावली , दि. १४ : तालुक्यातील मेहा बुजरुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये इयत्ता ७ वी पर्यंत वर्ग असून ह्यात ७ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक यांची गरज असताना मागील २ वर्षापासून फक्त ४ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या वर्गाला शिकवल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षाणिक नुकसान होत आहे. हि गंभीर बाबा लक्षात घेत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर सोनवाणे यांच्याकडे जितू धात्रक व मेहा वासीय यांच्या पाठपुराव्यातून मोर्चा, आंदोलन करून एका महिन्याच्या आत शिक्षक न दिल्यास शाळाबंद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.
सावली तालुक्यातील मेहा बुजरुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून ते सातवीपर्यंत वर्ग असून मागील दोन वर्षपासून शाळेचा कार्यभार ४ शिक्षक व १ मुख्याध्यापकावर असून शाळेला आवश्यक असलेले २ शिक्षकांची आद्यपही नियुक्ती न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. भविष्यात खूप मोठा फटकाशेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याला बसण्याची शकयत आहे. पालक हे गरीब असल्यामुळे ते त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवू शकत नाही त्यामुळे त्यांच्या पुन्हा नुकसान होईल. यापूर्वी गावात पालक सभा घेण्यात आली आणि सावली येथे बीडीओ आणि तहसीलदार यांच्याकडे सुद्धा मोर्चा आंदोलन करण्यात आले. तेव्हा त्यांच्याकडून १ महिन्यात शिक्षक देऊ असे आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्यापही त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध झाले नाही. त्यामुळे आता थेट शिक्षणधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर सोनवाने यांच्यावर मोर्चा आंदोलन करण्यात करून निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी एक महिन्याच्या आता मेहा बुजरुक येथे शिक्षक उपलब्ध करण्य देण्यात येतील असे आश्वासन दिले. तर एक महिन्यात शिक्षकाची नियुक्ती न केल्यास शाळाबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.
येवेळी जितू धात्रक, प्रकाश कोलते, नंदाजी पेंदाम, रोशन पेंडाम, मदन निकुरे, प्रमोद इलमलवार , गोपीचंद बोरकुटे, अभिषेक कोरडे,अमोल कोरडे,प्रतिभा कोलते,यामीना कोलते, शीतल गेडाम,गीता निकुरे,योगिता निकुरे,कविता निकुरे आणि इतर महिला व पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here