जि.प. केंद्र शाळा कुनघाडा (रै.) येथे वृक्षारोपण

0
28

– शाळा व्यवस्थापन समितीचा उपक्रम

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कुनघाडा रैय्यतवारी येथील जि. प. केंद्र शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “झाडे लावा झाडे जगवा” या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणास पुढाकार घेत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले.
आपल्या आयुष्यात झाडांचे महत्व असून पर्यावरण सुशोभित करणे ह्या व्यतिरिक्त देखील झाडे खूप काही करतात. आपल्या आजूबाजूचा कार्बन डायऑक्साइड सोशून, आपल्याला प्राणवायू देतात. झाडे आपले उनापासून सौरक्षण करतात. याचाच एक भाग म्हणून शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेचं सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने शालेय व्यवस्थापन समितीने वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेतले. सदर वृक्षारोपणाला कुनघाडा ग्रामपंचायतीचे सरपंचा सौ. अल्का धोडरे, उपसरपंच अनिल कुनघाडकर, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार, माजी सरपंच अविनाश चलाख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश गझलपेल्लीवार तसेच सर्व सदस्य, मुख्यध्यापिका गीता शेंडे, प्रमोद बोरसरे, गुरूदास सोनटक्के, अनिल दुर्गे, अंजली तंगडपल्लीवार, विजय दूधबावरे, अभिषेक लोखंडे, ज्ञानदेवी कुनघाडकर, अश्विनी उराडे व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here