– अपघातांचे सत्र सुरूच
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२६ : शहरातील नगर परिषद कर वसुलीत व्यस्त असताना, चंद्रपूर मार्गावर घोंगावणाऱ्या अंधाराकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यावरील पथदिवे बंद पडल्याने अपघातांचे सत्र सुरूच असून, नागरिकांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे.
गेल्या काही दिवसांत या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असून, तातडीने पथदिवे सुरू न केल्यास अधिक मोठ्या दुर्घटनांची शक्यता नाकारता येत नाही. आता नागरिकांनीच या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #नगर परिषद गडचिरोली)