लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी बहुउदेशीय संस्था, लांजेडा. द्वारा आयोजित पारोलिंगो, कायोपुनेम देवस्थानांची तिसरा स्थापना दिन, क्रांतिवीर बाबूरावजी सेडमाके जयंती व आदिवासी प्रबोधन कार्यक्रम आज दिनाक २७-मार्च- २०२५ रोजी क्रांतिवीर बिरसा मुंडा परिसर, शा. आदिवासी मुलींचे वस्तीगृह जवळ, लांजेडा गडचिरोली येथे आयोजित केला होता. त्यावेळी माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी अध्यक्षस्थानी बोलतांना म्हटले की. आपल्याला धर्म ,संस्कृती ,परंपरा, संस्कार त्याची जोपासना ही आपल्या समाजामध्ये झाली पाहिजे. आज जगामध्ये जेवढे काही धर्म आहेत ख्रिश्चन , मुस्लिम, सिख , हिंदू, जैन धर्माचे वेगवेगळे धर्म जे आहेत त्यांनी संघटित होऊन त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार आणि विकास साधून घेतलेला आहे. म्हणून बाकी समाजाचा विकास बघाता आणि आपल्या आदिवासी समाजाचा विकास बघाता त्याच्यामध्ये कुठेतरी तफावत आढळते आहे . याचा मागचा कारण हाच आहे की. आपण आपली धर्म संस्कृती परंपरा त्याच्यातले चांगले संस्कार हे कुठेतरी आपण विसरत चाललो आहे. त्याचा प्रचार प्रसार केला नाही तर कदाचित आपला समाज थोडा आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक संघटित होण्याच्या दृष्टिकोनातून थोडसं मागे पडत चालला आहे. असं म्हणाला काही हरकत नाही. आदिवासी हा या देशातील मूळनिवासी आहे. या देशावर १७०० वर्ष राज्य करणारा कोणता जमात असेल तर ती आदिवासी जमात आहे. एवढं इतिहास असलेला. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला हा समाज आहे. आपण सगळे निसर्ग पूजक आहोत. आपल्या समाजात निसर्गाला अतिशय महत्त्व दिलाय. त्याचा अर्थ असा आहे की. निसर्गापासून आपल्याला जीवनामध्ये आवश्यक असलेले सर्व काही मिळत आहे. दोन-चार वर्षा अगोदर कोरोना सारखा फार मोठी जागतिक महामारी हे आपल्याला अनुभवायला मिळाली. त्यामध्ये करोडो – अब्जो रुपये असलेले लोकांना हे ऑक्सिजन पैशांनी मिळाला नाही. परंतु आपल्या ज्या ग्रामीण भागामध्ये राहणारे जे आदिवासी लोक आहेत त्यांनी जंगलांची झाडांची जोपासना केली. त्यामुळे त्यांना कुठलेच पैसे खर्च करून ऑक्सिजन मिळवावे लागले नाही . ते निसर्गानी दिले. आणि म्हणून आपला धर्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा फार मोठा विचार असलेला धर्म आहे . आणि म्हणून गोंडी धर्माला आपण अभिमानाने स्वाभिमानाने एकसंघ येऊन आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रचार करावा. सोबतच आपली संस्कृती आपली भाषा आपला धर्म टिकवण्यासाठी समाज बांधवाणी एकत्र यावे. असे मार्गदर्शन माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी केले.
यावेळी उद्घाटक म्हणून माजी आमदार डॉ देवराव होळी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी नगरसेवक गुलाबराव मडावी, निवृत नायब तहसीलदार विक्रम गेडाम, रामेश्वर गेडाम, जनार्धन मडावी, विश्वेश्वर मेश्राम, उईकेजी, बाळू मेश्राम, जनार्धन मडावी, शशिकला मडावी, भास्कर गोटा, पुंडलिक गावडे, शुभांगी सुरपाम, पेंदम, गेडाम आदी बहुसंखेने आदिवासी बांधव उपस्थित होते.