40 नामांकित कंपन्यांसह हजारो संधी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 27 मार्च : जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी अभूतपूर्व संधी घेऊन आली आहे. गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने उद्या 28 मार्च रोजी महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात महाराष्ट्रातील 40 नामांकित कंपन्या सहभाग घेणार असून, उत्पादन, आयटी, ऊर्जा, ऑटोमोबाईल आणि बँकिंग अशा विविध क्षेत्रांतील भरघोस नोकरीच्या संधी उमेदवारांना मिळणार आहेत. विशेष म्हणजे, थेट मुलाखतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
हजारो बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी
या मेळाव्यासाठी आतापर्यंत 3,000 हून अधिक पदवीधरांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांना कार्यक्रमस्थळी थेट नोंदणी करून सहभाग घेता येईल. आयोजकांच्या मते, सुमारे 10 हजार उमेदवारांचा या मेळाव्यात सहभाग अपेक्षित आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने आयोजित या भव्य मेळाव्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
– 28 मार्च रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मेळावा सुरू राहील.
-उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.
-प्रत्येक उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील कंपन्यांकडून मुलाखतीसाठी टोकण दिले जाईल.
– निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र प्रदान केले जाईल.
तरुणांनी संधीचा लाभ घ्यावा – आमदार वंजारी यांचे आवाहन
या भव्य रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक तरुण-तरुणींनी सहभागी व्हावे आणि आपल्या करिअरला नवीन दिशा द्यावी, असे आवाहन आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Chandrapurnews #रोजगार #रोजगार मेळावा #Abhijit Wanjarri, MLC @abhijit_wanjarri #abhijitwanjari )