कृषी उत्पादनावरील आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयावर सरकारची भूमिका स्पष्ट करा

47

खासदार डॉ. नामदेव किरसान यांची लोकसभेत मागणी

लोकवृत्त न्यूज
दिल्ली :: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी 1 एप्रिल 2025 रोजी लोकसभेत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयावर सरकारला धारेवर धरले. भारतात सरासरी 39% आयात शुल्क आकारले जाते, आणि 2023 मध्ये सरकारने हे शुल्क कमी करण्याचे संकेत दिले होते.

खासदार किरसान यांनी प्रश्न उपस्थित करत विचारले की, सरकारने हे शुल्क कमी करण्याचा निर्णय खरोखर घेतला आहे का? जर घेतला असेल, तर किती टक्के कपात केली जाणार आहे? तसेच, देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, यासाठी कोणती ठोस धोरणे आखली जात आहेत? भारतीय शेतकरी आधीच हमीभावाच्या अभावामुळे अडचणीत आहेत. जर आयात शुल्क कमी झाले, तर परदेशी कृषी उत्पादने भारतीय बाजारात स्वस्त दरात उपलब्ध होतील, परिणामी देशी उत्पादकांना मोठी स्पर्धा सहन करावी लागेल. त्यामुळे सरकारने या निर्णयाची स्पष्टता द्यावी आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी खासदार किरसान यांनी केली आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Dr. Namdeo Kirsan, NIC, Gadchiroli-Chimur (Maharashtra)) दत्त